आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जाणीवेतून प्रशासनात कर्तव्य बजावावे ; बीडीओ वेणीकर यांचे प्रतिपादन

सिंदखेडराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशासकीय सेवेत सामाजिक जाण व कर्तव्याचे भान ठेवून जर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्य केले, तर त्या कार्यकक्षेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचे प्रेम प्राप्त होते, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी केले.गटशिक्षणाधिकारी तुकाराम आदबने यांच्या सेवानिवृत्ती निमित्त दुसरबीड येथे नुकत्याच आयोजित सेवापूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी लोणार गटशिक्षणाधिकारी विष्णू राजगुरू, जंगलसिंग राठोड, कुंभारे, दीपक नागरे, प्रवीण गीते, भगवान नागरे, आबासाहेब मोरे, देविदास लांभाडे, समाधान पाझडे, रतीराम गायकवाड, शिवराज कायंदे, डॉ. गारोळे, प्राचार्य भांगे, दिलीप काकडे, अलका लव्हाळे, अपर्णा देशमुख, अजाबराव देवकर, शिवदास तुपकर, रमेश खोडके, खुशाल झोटे उपस्थिती होते.

या वेळी सेवानिवृत्त झालेले गटशिक्षणाधिकारी तुकाराम आदबने, अलका आदबने, सचिन आदबने या कुटुंबीयांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी तुकाराम आदबने यांनी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे विवेचन करत शिक्षणामुळेच आपली उन्नती झाल्याचे सांगितले. सहायक शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी या सेवा प्रवासात विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्याचे स्नेह व सहकार्य मिळाल्याने चांगले काम करता आल्याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगनाथ गावडे यांनी केले. सूत्रसंचालन मधुकर लहाने व शरद भोकरे यांनी केले, तर आभार गैबीनंद घुगे यांनी केले. कार्यक्रमासाठी माधव देशमुख, किशोर पवार, पी. एम. मापारी, नंदकिशोर शिंगणे, भानुदास लव्हाळे, अशोक नागरे, अशोक उगलमुगले, गणेश डिघोळे, अरुण खेडेकर, पंढरी बुरकुल, मीरा जाधव, वंदना टाकसाळ, शेख अहमद, शेख एजाज, रफिक खान, शिवशंकर डोईफोडे, संतोष सरकटे यांनी परिश्रम घेतले. सेवापूर्ती सोहळ्यापूर्वी सकाळी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...