आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:प्रकाश पर्वानिमित्त खामगाव येथे आज समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम; आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती

खामगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरू तेग बहादूरसिंहजी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त ४ मे रोजी स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून या कार्यक्रमात तीन हजारावर नागरिकांची उपस्थिती लाभणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

येथील श्री गुरुद्वारा सिंग सभा आणि तेग बहादूर सिंहजी प्रकाश पर्व समितीच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशपर्वाचं आयोजन करण्यात आले आहे. गुरू तेग बहादूर सिंहजी यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे प्रमुख मार्गदर्शन करतील. तर श्री गुरुद्वारा सिंघ सभा खामगावचे ग्रंथी मानसिंह खालसा यांचे उद्बोधन लाभणार असल्याची माहिती महादेवराव भोजने यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुरुद्वारा सिंघ सभेत आयोजित पत्रकार परिषदेला संजय बोरे, अमोल अंधारे, प्रसाद गाजुल, श्री गुरुद्वारा सिंघ सभेचे अध्यक्ष चरणजीतसिंह जुनेजा, उपाध्यक्ष जितेंद्रसिंह मेहरा, अमरजीतसिंह बग्गा, सचिव जसवंतसिंह शीख, चरणजितसिंह मेहरा, अ‍ॅड.मनदीपसिंग चव्हाण, सहकोशाध्यक्ष कुलदीपसिंह संधू, परमजीतसिंह शीख आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गुरुद्वारा सिंग सभा आणि ते तेग बहादूर सिंहजी प्रकाश पर्व समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...