आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संग्रामपुर:संग्रामपुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; सोयाबीन, तूर, उळीड, मुंग, कापूस, ज्वारी, मका आदी पिकांचे नुकसान

संग्रामपुर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पावसामुळे रात्रभर वीज गुल; केदार, सातलोन, पांडव, वान नद्यांना पूर

तालुक्यात शुक्रवारच्या (दि. 26) रात्रीपासून पहाटे 6 वाजेपर्यंत ठिकठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सोयाबीन, तूर, उळीड, मुंग, कापूस,ज्वारी, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. 

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेकडो एकर दुबार पेरणी केलेल्या शेतात पाणी साचले असून त्या परिसरातील शेती मुसळधार पावसाने खरडून वाहून गेली व शेतीला तलावाचे स्वरूप आहे होते. वरवट बकाल येथील वार्ड क्र 5 मध्ये संपूर्ण घरात पाणी शिरले व मुख्य रस्त्यावरून पुरासारखे पाणी वाहत होते. बावनबीर शिवारातील काही भागात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले व धुरे फुटल्याने शेती खरडून गेली ह्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय ढगे यांनी पाहणी केली. अगोदरच तालुक्यात बोगस बियाण्यांच्या शेकडो तक्रारी कृषी विभागात शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.  शेतकरी विविध समस्याचा सामना करीत आहे. तर कसे तरी पीक बहरात असतांना अचानक निर्सगाने शेतकऱ्याच्या तोंडातील घास हिराउन घेतल्याने शेतकरी निर्सगापुढे हतबल झाले असुन महसुल विभाग, कृषी विभागाने विना विलंब  वादळी वाऱ्या सह मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करुन शेतकऱ्याना आर्थिक मदत करावी अशी मागणी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.      

वरवट बकाल येथील अतिवृष्टीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाखो रुपयांचे धान्याचे नुकसान झाले असून संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन दाने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, बाजार समितीचे माजी सभापती घनश्‍याम राठी यांनी घटनास्थळी दाखल होत व्यापार्‍यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली सदर नुकसान लाखोंच्या घरात असून कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. 

रात्री झालेल्या मूसळधार पावसाने बाजार समितीच्या व्यापारी वर्गाच्या धान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याला दोषी बाजार समिती प्रशासन आहे, 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत संग्रामपूर तालुक्यातील जनतेनी आमदार कुटे यांच्या पॅनल ला हाणून पाडले, सभापती पद शिवसेने कडे देण्यात आले. ठरल्या प्रमाणे 15 महिने नंतर राजीनामा झाला, परंतु काहींना असे वाटले की सरकार भाजपचे होते म्हणून सभापती पद भाजपच्या कडे असल्यास विकास जास्त होईल परंतु आज रोजी साडेतीन वर्षाचा कालावधी उलटल्यावरही तत्कालीन पालकमंत्री डॉ संजय कुटे यांनी फुटी कवडीही बाजार समितीला दिली नाही. धान्य व्यापारी यांना बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी. शांताराम दाणे, जिल्हाप्रमुख शिवसेना तथा संचालक बाजार समिती संग्रामपूर.   

बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, हरभरा आदी धान्य साठलेले होते. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी बाजार समिती मध्ये घुसल्याने लाखो रुपयांचे आमचे नुकसान झाले आहे. बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी. - हरिश राठी धान्य व्यापारी.         

आमदार कुटे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी आमदार कुटे यांनी प्रथम वरवट बकाल येथील  बाजार समिती व वानखेड, दुर्गादैत्य येथील शेतीत साचलेल्या पाण्याची पाहणी करून तहसीलदार यांना तात्काळ सर्व्ह वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. ह्यावेळी जानराव देशमुख, लोकेश राठी, सुभाष हागे, पांडुरंग हागे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...