आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:तहसील कार्यालयात नेताना अवैध गौण खनिजांचे ट्रॅक्टर केले पलटी ; तलाठ्याला मारण्याचा प्रयत्न

चिखली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध गौण खनिजांचे ट्रॅक्टर पकडुन येथील तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना ट्रॅक्टर मालकाने स्वताचा जीव वाचवून ट्रॅक्टर जाणून बुजून पलटी केले. या अपघातात ट्रॅक्टरवर बसलेले तलाठी व कोतवाल दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना तालुक्यातील शेलुद जवळ घडली. प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालका विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून भिका नारायण जाधव रा. शेलुद, असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

२३ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास लाल रंगाचे महिंद्रा ट्रॅक्टर अवैध रित्या गौण खनिजांची वाहतूक करीत असल्याचे तलाठी राहुल जाधव व कोतवाल विनोद सोनुने यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर ट्रॅक्टर मालक भिका जाधव यास पंचनाम्यावर सही करण्यास सांगितले. परंतु मालक भिका जाधव याने उडवाउडवीची उत्तरे देत सह्या करण्यास नकार दिला. ही बाब तलाठी राहुल जाधव यांनी तहसीलदारांना सांगितली. त्यावर तहसीलदारांनी मंडळ अधिकारी अरविंद तुकाराम शेळके यांना ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. दरम्यान ट्रॅक्टर घेऊन तलाठी, कोतवाल व ट्रॅक्टर मालक चिखली कडे निघाले. त्यावेळी मंडळ अधिकारी हे दुचाकी घेऊन ट्रॅक्टरच्या मागे होते. चिखली कडे येत असतानाच ट्रॅक्टर मालक भिका जाधव याने स्वताचा जीव वाचवत ट्रॅक्टर जाणीवपूर्वक पलटी केले.

या अपघातात तलाठी राहुल जाधव हे जागेवर बेशुद्ध झाले तर कोतवाल विनोद सोनुने हा सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत दोघांना तातडीने शहरातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर मालक भिका जाधव याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...