आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:वाळूची अवैध वाहतूक करणारे‎ ट्रॅक्टर पकडले; चालक पसार‎

मलकापूर पांग्रा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या‎ एका ट्रॅक्टरवर िसंदखेडराजाचे‎ तहसीलदार सुनील सावंत यांनी‎ गुरुवारी, २ मार्च रोजी रात्री‎ कारवाई केली.‎ शिवणी टाका मार्गाने ट्रॅक्टरद्वारे‎ वाळूची चोरटी वाहतूक केली‎ जात असल्याची माहिती गुरुवारी‎ रात्री तहसीलदार सावंत यांना‎ मिळाली. त्यानंतर दुचाकीने‎ पाठलाग करून त्यांनी रात्री दोन‎ वाजता दरम्यान ट्रॅक्टर (क्रमांक :‎ एमएच २८ - एजे ५२८५)‎ थांबवले. यावेळी मजूर आणि‎ चालकाने ट्रॅक्टर जागेवरच सोडून‎ अंधाराचा फायदा घेत पळ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ काढला.‎

तहसीलदार सावंत यांनी‎ चौकशी केली असता ट्रॅक्टरचे‎ मालक गणेश बंडू मेहेत्रे‎ असल्याचे समोर आहे. दरम्यान,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा‎ करण्यात आले. या कारवाईत‎ कोतवाल आकाश माघाडे,‎ पोलीस कर्मचारी वायाळ आदींनी‎ सहभाग घेतला.‎

बातम्या आणखी आहेत...