आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:व्यापारी करताहेत एक रुपया किलोने कांद्याची खरेदी; बाजारात मात्र पाच रुपये किलोचा भाव

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार २१८ टन उन्हाळी कांद्याचे उत्पादन यावेळी झाले होते. मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने शेगाव भागात कांदा फुकट देण्यात आला. सध्या व्यापारी एक रुपया भाव देत आहेत. जो भाव घेतला असता पेरणीचाही खर्च निघत नाही. उलट शेतकऱ्यालाच अधिकचा खर्च द्यावा लागतोय. हाच कांदा व्यापारी बाजारात दोन रुपये ते पाच रुपये भावाने विकत आहेत. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे १६.६ टन कांद्याचे क्षेत्र रब्बीत बाधित झाले आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील कांद्याचे यावेळी नुकसान झाल्याने नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून मात्र या मागणीला रेटा दिला जात नसल्याने लोकप्रतिनिधींबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासिनता आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात कांद्याची लागवड ९९०. ९५ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली होती. त्यावर १७ हजार ८०२. ५० टन उत्पादन झाले होते. सरासरी १७.९७ टन असे हे उत्पादन होते. लेट कांद्याची लागवड एक हजार ५६६ हेक्टरवर करण्यात आली होती. त्याचे उत्पादन २४ हजार ००५ टन इतके झाले होते. हे उत्पादन सरासरी १५.३३ टन असे होते. बियाण्यांसाठी ही ६९८४. ९० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. ६१७६.०४ टन बियाण्यांचे उत्पादन झाले. सरासरी ०.८८ टन हे उत्पादन आहे. रब्बीच्या हंगामात जिल्ह्यात ९००९. ६ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी १६.६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने कांद्याचे पीक ८९९३ हेक्टर क्षेत्रावरच बहरले होते. त्यामुळे एक लाख ५३ हजार २१८ टन इतके उत्पादन जिल्ह्यात झाले आहे. मात्र अजूनही कांदा भाव मिळत नसल्याने तो शेतातच पडून आहे. आता खरिपाची वेळ येत असल्याने मिळेल त्या भावाने कांदा विकावा लागणार आहे. अन्यथा मोफत वाटप करावा लागणार आहे. कांदा उत्पादनाचा हा शासकीय गोषवारा असला तरी यापेक्षा अधिक कांदा उत्पादनाची शक्यता व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय उत्पादन
प्रति हेक्टरी उत्पादन शेतकऱ्यांना बऱ्यापैकी यावेळी कांद्याचे झाले. बुलडाणा तालुक्यात २० टन, चिखली १२, मोताळा २०, मलकापूर २५, खामगाव १९, शेगाव २३, नांदुरा ७, जळगाव जामोद १०, संग्रामपूर १२, मेहकर २५, लोणार १४, देऊळगाव राजा ३५, सिंदखेड राजा १२ असे प्रति हेक्टर उत्पादन झाले आहे.

कांद्याची खरेदी नाफेडने करावी
सध्या कांदा पेरणीला जेवढा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. तेवढाही खर्च सध्या मिळत नाही. शेगावात तर कांदा मोफत विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली. व्यापाऱ्यांकडे कांदा विकावयास नेला तर कांद्याच्या विक्रीपेक्षा स्वतःजवळीलच खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे नाफेडच्या खरेदीतूनच पुसली जाऊ शकतात. तेव्हा नाफेड मार्फत खरेदी करण्यात यावी.
-चक्रधर लांडे, जिल्हाध्यक्ष, भाजप किसान आघाडी

बातम्या आणखी आहेत...