आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:वाहनात जीपीएस डिव्हाईस न बसवता गौण खनिजाची वाहतूक

खामगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अवैध प्रकारे गौण खनिजांचा साठा करुन ठेवणे, अवैध प्रकारे गौण खनिज वाहतूक करणे आदी प्रकारांवर मोठया प्रमाणात कारवाया होत नाहीत. तर अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस डिव्हाईस बसवणे बंधनकारक असताना ते बसवण्यात न आल्याच्या कारवाई होताना दिसत नाही. मात्र खामगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी बुधवारी केलेल्या पाहणीत तीन वाहनांवर जीपीएस डिव्हाईस न बसवल्याचे निदर्शनात आल्याने तीनही वाहने पकडून पोलिस स्टेशनला जमा केली आहेत.

अवैध वाळू वाहतुकीला चाप लावण्यासाठी वाळूसह गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस डिव्हाईस लावणे आवश्यक आहे. ३१ जुलै ही या वाहनावर डिव्हाईस लावणे अखेरची मुदत होती. जिल्ह्यात या प्रणालीची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू झाली. गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस नसल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला होता. सर्व गौण खनिज वाहतूकदारांना वाहनांवर जीपीएस डिव्हाईस बसवणे बंधनकारक असल्याच्या सूचना महसूल विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

त्या अनुषंगाने तहसीलदार अतुल पाटोळे यांनी बुधवारी खामगाव जलंब रोड वरील शासकीय तंत्रनिकेतन ग्राउंड समोर वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांची तपासणी केली असता. त्यांच्याकडे रॉयल्टी दिसून आली. मात्र प्रशासनाने बंधन कारक केलेल्या जीपीएस प्रणालीचा अवलंब न केल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे वाहन क्र. एम एच ३० बी डी ४३३२, एम एच २८ ए बी ४७०८ व एम एच २८ बी बी ९१५० क्रमांकाची तीनही वाहने पोलिस स्टेशन मध्ये जमा करण्यात आली आहेत. यामुळे गौण खनिज वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. डिव्हाईस न लावणाऱ्यांवर कारवाई : गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी आपल्या वाहनावर जीपीएस डिव्हाइस लावणे आवश्यक आहे. ज्या वाहनांवर जीपीएस डिव्हाइस लावले नसेल अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिला.

अवैध वाळूचे साठे वाढले; महसूल विभागाचे दुर्लक्ष
जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळूचे साठे सध्या करुन ठेवण्यात आले आहेत. या साठ्यांकडे महसूल विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. साठे बांधकाम करणाऱ्यांचे असल्यास त्यांना सूट मिळेल परंतु, एरवी ठेकेदार करत असलेले साठे महसूल अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटत आहेत. या वाळू साठ्यावर जीपीएस डिव्हाईसची तरतूद केली जात नाही. गौण खनिजाबाबतही असेच आहे. तरी प्रशासनाने अशा कारवाई करुन महसूल वाढवावा,अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...