आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवर्धन व संगोपन:राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपणाचा उपक्रम

वरवट बकाल24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या निर्देशानुसार प्रत्येक नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात ‘एक विषय, एक झाड वृक्षारोपण, संवर्धन व संगोपन’ या विषयांतर्गत महाविद्यालयातील रासेयोच्या वतीने विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसर तसेच आपले घर, आंगण, शेत, बंधारे, पडीक जागा, सामाजिक वनीकरणाची उपलब्ध जागा आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यास आवाहन करण्यात आले. त्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये ३ सप्टेंबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.राजेंद्र कोरडे, प्रा. सुरेश भालतडक, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सोनाली तायडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. निशिगंध सातव, इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष पवार, मराठी विभागप्रमुख प्रा. आनंद धुंदाळे तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. रासेयोच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...