आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगोपनाची जबाबदारी:चेतना विकास विद्यालयात वृक्षारोपण

मोताळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील परडा शिवारातील चेतना विकास विद्यालयात वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला आहे. यावेळी जवळपास शंभर झाडांची लागवड करण्यात आली असून या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे.१३ ऑगस्ट रोजी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात वनपरिक्षेत्र अधिकारी एन.डी. मुरकुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. विजय चोपडे, योगेश भैय्या शास्त्री शेतीतज्ञ, वनपाल, वनरक्षक व वन कर्मचारी उपस्थित होते. योगेश शास्त्री यांनी संस्थेचे उद्देश व उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...