आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:जन शिक्षण संस्थानच्या वतीने वृक्षारोपण

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रिय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांचा उपक्रम असलेल्या जन शिक्षण संस्थानच्या वतीने आज २७ जुलै रोजी स्वच्छता पंधरवाड्यातील एक उपक्रमाचा भाग म्हणून पाणी पातळी वाढावी व जमिनीची धूप थांबवण्याच्या उद्देशाने पोखरी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच संतोष टेकाडे, उपसरपंच बबनराव गायके, माजी सरपंच गोकुळ औतकार, मुख्याध्यापक व्हि. के. कोलते, सोपान ऐकडे, दगडू वाघ, पुरुषोत्तम ऐकडे, साहेबराव ऐकडे, दिनकर ऐकडे, गंगा ऐकडे, जन शिक्षण संस्थानाचे अध्यक्ष भालचंद्र देशमुख यांनी प्रास्ताविक मध्ये जन शिक्षण संस्थानच्या ध्येय व उद्दिष्टाबाबत तसेच स्वच्छता पंधरवड्याची आवश्यकतेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तर जन शिक्षण संस्थानचे संचालक भागवत पेदे, कार्यक्रम अधिकारी अरुण देशमुख, सहा.कार्यक्रम अधिकारी आयेशा शेख, समाधान पालकर, अनिल दळवी यांची उपस्थिती होती.उपस्थितांचे आभार जन शिक्षण संस्थानचे सहायक कार्यक्रम अधिकारी आयेशा शेख यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...