आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय स्तंभाला मानवंदना:भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानवंदना‎

रिसोड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त‎ विजय स्तंभाला मानवंदना कार्यक्रमाचे ‎आयोजन भारतीय बौद्ध महासभेचे‎ रिसोड शहराध्यक्ष राहुल जुमडे यांनी‎ केले होते.‎ भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त ‎शहिदांना अभिवादन करण्यासाठी‎ दरवर्षी भीम अनुयायी जात असतात. ‎ज्यांना भीमा कोरेगावला जाणे शक्य‎ झाले नाही, त्या भीम अनुयायांसाठी‎ स्थानिक पातळीवर अभिवादन‎ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.‎ त्याचप्रमाणे संबोधी बुद्ध विहार एकता‎ नगर रिसोड येथे विजय स्तंभाची‎ प्रतिकृती उभारून मानवंदना देण्यात‎ आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष‎ शालिग्राम पठाडे, तर प्रमुख पाहुणे‎ म्हणून कपिल वाठोरे, माजी सैनिक‎ महार रेजिमेंट उपस्थित होते. प्रथम‎ मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण‎‎ करण्यात आले.

तथागत गौतम बुद्ध व‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून‎ अभिवादन करण्यात आले. त्रिशरण‎ पंचशील भंतेजी नागसेन यांनी दिले.‎ विजय स्तंभाला अभिवादन व‎ मानवंदना कपिल वाठोरे यांच्या‎ नेतृत्वाखाली रत्नपारखी, गजानन‎ गवई, रवी खंडारे, तर समता सैनिक‎ दल तालुका प्रमुख रामजी बनकर‎ यांच्या नेतृत्वात अभिमन्यू पंडित,‎ गजानन खरात, गणेश कवडे व‎ गोवर्धना येथील महिला समता सैनिक‎ दल, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व‎ पदाधिकारी, उपासक व उपासिका‎ यांच्या वतीने देण्यात आली. या‎ कार्यक्रमाला प्राचार्य भास्कर‎ गायकवाड, प्राचार्य विजय तुरुकमाने,‎ प्रा. रंगनाथ धांडे, प्रा. जयवंतराव‎ हेलोडे, प्रा. नंदकिशोर खैरे, टी. एन.‎ वानखेडे, डॉ. गजानन हुले, सागर‎ क्षीरसागर, अॅड. शरद मोरे, रवी अंभोरे‎ उपस्थित होते. सूत्रसंचालन कैलास‎ सुर्वे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...