आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मुख्य पोस्ट ऑफिससह १५ उप पोस्ट ऑफिसच्या १४२ ग्रामीण शाखांमध्ये आणि बुलडाणा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससह १८ उप पोस्ट ऑफिसमध्ये अशाप्रकारे १७६ ग्रामीण शाखांमध्ये एकूण ३१८ ग्रामीण शाखांमध्ये सुमारे ७ हजार तिरंगा केवळ २५ रुपये किमतीत उपलब्ध आहेत, तसेच सर्वसामान्य नागरिकांचा तिरंगा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पोस्ट ऑफिसचे मुख्य पोस्ट मास्टर सी.पी.शुक्ला यांनी दिली.
देशाचा तिरंगा ध्वज हा राष्ट्रध्वज आहे. यात अशोक चक्रासोबत तीन रंग आहेत. भगवा, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग असून मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. यंदा देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा ध्वज पहिल्यांदा २२ जुलै १९४७ रोजी राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान लोकसहभागातून बहुतांश लोक घरोघरी झेंडे फडकवतील. सर्व लोक त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून या दिवसासाठी ध्वज सहज खरेदी करू शकतात. अमडापूर, डोणगाव, दुसरबीड, जीएस कॉलेज, जानेफळ, केला नगर, लोणार, माटरगाव, मेहकर, पातुर्डा, पिंपळगाव राजा, पिंपळगाव काळे, संग्रामपूर, शेगाव, सोनाळा या १५ उपशाखा आणि १४२ ग्रामीण पोस्ट ऑफिस खामगाव हेड पोस्ट अंतर्गत कार्यालय बुलडाणा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस अंतर्गत १८ सब पोस्ट ऑफिसच्या १७६ ग्रामीण शाखांमध्ये तिरंगा नागरिकांना उपलब्ध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.