आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाहक वास्तव:गतवर्षीच्या पावसाने भरले होते तुडूंब; यंदाच्या मान्सूची प्रतीक्षा

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील शेतीसाठी सिंचन व्यवस्था असलेली शंभर हेक्टर क्षेत्रातील तलाव आणि बंधारे कोरडे पडत चालले आहेत. जोपर्यंत दमदार पाऊस पडत नाही तोपर्यंत हे जल स्रोत असेच कोरडे राहणार असल्याने, भविष्यात या तलाव आणि बंधाऱ्यांच्या क्षेत्रातील सिंचनावर अवकळा येणार आहे. जिल्ह्यातील अशा नऊ सिंचन तलावांमध्ये केवळ ०.६३ दलघमी इतकाच साठा शिल्लक असून, कोल्हापुरी बंधारे कोरडे ठाक पडले आहेत.

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाद्वारे ही व्यवस्था सांभाळली जाते. कोरडा दुष्काळ उद्भवू नये यासाठी सिंचन विभागाला या जलस्रोतांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अशावेळी सिंचनाएवजी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे हा प्रशासनाचा दृष्टीकोन असतो. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सिंचनासाठी मोठी धरणे आहेत. ज्यामध्ये नळगंगा, खडकपूर्णा पूर्णत्वाकडे जाणाऱ्या जिगाव धरणाचाही समावेश आहे.

याव्यतिरिक्त पेनटाकळी, कोराडी असेही प्रकल्प आहेत. परजिल्हयालासुद्धा पाणी मिळेल असे मन व मस हे दोन प्रकल्प आहेत. याशिवाय मोठे प्रकल्प व लघु बंधारेही जिल्ह्यात आहेत. यातील मोठ्या प्रकल्पांचे संपूर्ण नियंत्रण आणि जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडे सिंचन व्यवस्था मोठया प्रमाणात होती. यामध्ये सिंचन तलाव, कोल्हापुर बंधारे, पाझर तलाव, गाव तलाव, साठवण बंधारा, सिमेंट नाला, बांध बंधारे अशी सिंचनाची व्यवस्था करणारी व्यवस्था होती. जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या शंभर हेक्टर क्षेत्रातील तलाव तसेच नदी-नाल्यांवरील बंधाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असे म्हणता येईल. याव्यतिरिक्त जिल्ह्यात शिवकालीन, ब्रिटीश कालीन, भूमिगत बंधारे सुध्दा आहेत. असे जिल्हा परिषदेकडे एक हजार २८१ बंधारे होते. मात्र त्यातील काही आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर काहींचे काम सुरू आहे.

अशी आहे तलावांची स्थिती व उपलब्ध जलसाठा
सध्या ७ कोल्हापुरी बंधारे असून त्यामध्ये ०.३६ दलघमी जलसाठा आहे. पाझर तलावांमध्ये ०.२८ दलघमी जलसाठा आहे. बाकी सिंचन तलाव, गाव तलाव, साठवण बंधारे, सिमेंट नाला बंधाऱ्यांत शुन्य टक्के जलसाठा आहे. या तलावांचा वापर सिंचनासह गावातील जनावरांना पाणी पिण्यासाठी सुध्दा होत होता. परंतु, आता तलावामध्ये पाणी नसल्याने ग्रामीण भागात जनावरांचाही पाण्याचा प्रश्न उदभवू शकतो.

बातम्या आणखी आहेत...