आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापूर पांग्रा परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस:दोन एकरातील सोयाबीन व कपाशी केली फस्त

मलकापूर पांग्रा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून परिसरात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेत शिवार चांगलेच बहरले आहेत. परंतु या पिकाला वन्य प्राण्यांची नजर लागली आहे. राेहींचे कळपच्या कळप शेतात घुसून शेती पिकाचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने या रोहींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

दि. २८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास दोन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात रोह्यांच्या कळपाने घुसून सोयाबीन व कपाशी पिकाची नासाडी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. वन्य प्राण्यांबाबत दरवर्षी शेतकरी वन विभागाकडे धाव घेऊन आपल्या समस्या मांडत आहे. परंतु वन विभागाकडून या तक्रारीकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मलकापूर पांग्रा पांग्रा परिसरातील आगेफळ, आंबेवाडी, झोटिंगा, पोपळ शिवनी, वाघाळा, हनवतखेड, दोरव्ही येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...