आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांचा विकास:समृद्धी लगत होणार दोन कृषीसमृद्ध नगरे

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यात समृद्धी येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ८९ किलोमीटर असणाऱ्या महामार्गावर साब्रा-काब्रा व सावरगाव माळ या दोन कृषी समृद्ध नवनगरांची निर्मिती होणार आहे. यात तब्बल साडेसहा हजार शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहणार असल्याने कृषी विकासासह पर्यटनालाही या मार्गामुळे चालना मिळणार आहे.

जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या चार तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावरील मेहकर तालुक्यातील २८३ किलोमीटरवर सब्रा-काब्रा, तर ३४० किलोमीटरवरील सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ अशी दोन कृषी समृद्ध नगरे प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात दोन कृषी समृद्ध नगरे होणार असल्याने याचा कृषी क्षेत्राला लाभ होणार आहे.

तसेच मेहकर तालुक्यातील साब्रा-काब्रा या नवनगरात साब्रा, काब्रा, भुमरा, फैजलापूर, गौंढाळा या पाच गावांचा समावेश राहणार आहे. यात सुमारे चार हजार शेतकरी सहभागी राहतील. यासाठी सुमारे १ हजार ३४८ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तालुक्यातील सावरगाव माळ, गोळेगाव, निमखेड सावरगाव माळ या नवनगरामध्ये समाविष्ट राहणार आहे. त्यामध्ये अडीच हजार शेतकरी सहभागी होणार असून यासाठी सुमारे १९४६ हेक्टर जमिन संपादित करण्यात आली आहे. जिल्ह्यात समृद्धी महामार्ग दोन पॅकेजमध्ये पूर्ण करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...