आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी प्रकरणातील दागिने‎ खरेदी:चोरीचे सोने घेणाऱ्या सराफा‎ व्यावसायिकांसह दोघांना कोठडी‎

देऊळगावराजा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चोरी प्रकरणातील सोन्याचे दागिने‎ खरेदी करणाऱ्या सराफा‎ व्यावसायिकांसह दोघांना येथील‎ न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन‎ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले‎ आहेत. या चोरी प्रकरणात या‎ अगोदर तीन आरोपी बुलडाणा‎ कारागृहात पाठवण्यात आले आहे.‎ त्यामुळे या सोने चोरी प्रकरणातील‎ आरोपीची संख्या आता पाचवर‎ गेली आहे.‎ शहरातील स्व. भास्करराव‎ शिंगणे नगर येथील रेखा प्रकाश‎ पाटमासे यांच्या घरातील १ लाख‎ २६ हजार रुपये किमतीच्या दागिने‎ अज्ञात चोरट्यांनी लंपास केले‎ होते. पोलिसांनी तपासचक्रे‎ फिरवली.

त्यानंतर फिर्यादीचा‎ नातेवाईक अजय विजय पाटमासे‎ याने गुन्ह्याची कबुली दिली.‎ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन‎ तपासाअंती चोरीचे सोने विकून‎ विल्हेवाट लावणाऱ्या अभिषेक‎ सचिन बंगाळे व रोहित जगन‎ शिवरकर या दोघांविरुद्ध गुन्हा‎ दाखल करून त्यांना अटक केली.‎ या चोरी प्रकरणात तीन आरोपींना‎ २८ डिसेंबर रोजी न्यायालयाने‎ न्यायालयीन कोठडीत पाठवले‎ होते. दरम्यान, पोलिसांनी तपासा‎ दरम्यान प्राप्त झालेल्या‎ माहितीवरून अफरोश शहा‎ दिलदार शहा यास ताब्यात घेऊन‎ त्याची विचारपूस केली असता‎ त्याने चोरीतील सोन्याचे झुंबर एक‎ जोड, सेवन पीस, कानातील वेल‎ सोन्याचे गहू मणी पोत ३० हजार‎ रुपयात परिस ज्वेलर्सचे मालक‎ संदीप दत्तात्रय शहाणे रा. भगवान‎ बाबा नगर यास विकल्याची कबुली‎ दिली.

पोलिसांनी दोघांना अटक‎ करून येथील न्यायालयात हजर‎ केले. तत्पूर्वी आरोपींनी‎ जामिनासाठी अर्ज दाखल केला‎ होता. त्यावर न्यायालयाने दोन्ही‎ पक्षाचा युक्तीवाद ऐकून‎ घेतल्यानंतर गुन्ह्यात सहभागी‎ असलेले पूर्वीचे तीन आरोपी यांचा‎ जामीन फेटाळून त्यांना बुलडाणा‎ मॅजिस्ट्रेट कोठडीत पाठवले. तसेच‎ आरोपींनी एकत्र हेतू ठेवून गुन्हा‎ केल्याचे प्रथमदर्शनी तपासात‎ निष्पन्न झाले. चोरीला गेलेला‎ मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत‎ केल्याचे सहाय्यक सरकारी वकील‎ अनिल शेळके यांनी न्यायालयाच्या‎ निदर्शनास आणून दिले. यावरून‎ न्यायालयाने आरोपींचा जामीन‎ अर्ज फेटाळत दोघांची कारागृहात‎ रवानगी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...