आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही आरोपींना अटक:दोन मित्रांनी केला मित्राचा खून ; बोराखेडी पोलिसांनी काही तासातच लावला छडा

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुजलेल्या अवस्थेत एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी सकाळी राजूर घाटातील मंदिराखाली खोल दरीत उघडकीस आली होती. त्या अनोळखी युवकाच्या मृतदेहाची ओळख पटली असून तो राजूर येथील रहिवासी असून मित्रांनीच त्याचा खून केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.राजूर येथील अजीम खान, सै. अजहर व शे. साहिल हे तिघे जीवलग मित्र होते. तीन- चार दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. हा वाद तेथेच मिटवण्यात आला होता. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा हा वाद उफाळून आला. यावेळी रागाच्या भरात सै. अजहर व शेख साहिल या दोघांनी अजीम खान यास बेदम मारहाण केली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर अजहर व साहिल यांनी अजीमचा मृतदेह राजुर घाटातील एका खोल दरीत फेकून दिला. या घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळताच ठाणेदार पाटील, पीएसआय अशोक रोकडे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधार झाल्यामुळे त्यांना मृतदेह सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा परिसर पिंजून काढला असता त्यांना खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह मिळून आला. घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मृताच्या शरीरावर जखमांचे वर्ण असल्याने घातपाताची शंका पोलिसांना आली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवून राजूर येथील सै. अजहर (२०) आणि शे. साहिल (२१) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखवताच त्यांनी खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी रोकडे, पोहेकॉ नंदकिशोर धांडे, दीपक पवार, विजय पैठणे, शिवाजी मोरे, राजेश हिवाळे, रमेश नरोटे, गणेश बरडे, आकाश यादव यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...