आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कारच्या अपघातात दोघाजणांचा मृत्यू; समृद्धी महामार्गावरील घटना, एक गंभीर

सिंदखेडराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या अपघातात कार मधील दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री समृद्धी महामार्गावरील पिंपळ खुटा शिवारात घडली.

जालना जिल्ह्यातील जामवडी येथील माजी सरपंच भाऊलाल लक्ष्मण पवार हे त्यांचे सहकारी विठ्ठल एकनाथ लष्कर व राम पवार यांच्यासोबत एम.एच. २१ / बी एफ/ ७६५९ या क्रमांकाच्या कारने शेंदुर्जन येथे लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपून ते शेंदुर्जन येथून परतले. त्यांनी समृद्धी महामार्गाने जामवाडी येथे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु ते दिशा चुकल्याने ते परत नागपूरकडे जाताना पिंपळखुटा येथील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार बाजूच्या लेन वर जावून पलटी झाली. यात भाऊलाल पवार हे ठार झाले

बातम्या आणखी आहेत...