आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखाचा डोंगर:भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला

खामगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव ट्रकने कामावरून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले. ही घटना खामगाव-अकोला मार्गावरील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ १३ मे रोजीच्या रात्री ही घडली. वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पतीचे निधन झाल्याने सातपुते यांच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेरे मारण्याऐवजी पतीचे अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ सातपुते यांच्या पत्नीवर आली आहे. तालुक्यातील टेंभुर्णा येथील गजानन रामभाऊ सातपुते वय ३७ हे खासगी चालक म्हणून व्यवसाय करतात. रात्री काही कामानिमित्त दुचाकीने ते खामगावकडे निघाले होते.

बातम्या आणखी आहेत...