आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरधाव जाणाऱ्या कारने समोरून येत असलेल्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात बावीस वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बुलडाणा-अजिंठा मार्गावरील दत्तपूर गावाजवळ घडली.काही दिवसापासून बुलडाणा-अजिंठा मार्गावरील दत्तपूर गावाजवळ टोल नाक्याचे काम सुरू आहे.
दरम्यान देऊळघाट येथील शफिक खान मेहमूद खान हा (एम.एच. २८, बिएल ८८२१) दुचाकीने दत्तपूरकडून देऊळघाटकडे येत होता. तर पिंपळगाव रेणुकाई येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक गणेश नरोटे हे (एम.एच. २८, बी.के. ४६५६) कारने बुलडाण्याहून गुम्मीला गावी जात होते. दत्तपूर गावाजवळील टोल नाक्यावर येताच दुचाकी व कारचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शफिकखान हा गंभीर जखमी झाला. अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्याला तत्काळ बुलडाणा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक वर्षांपासून बुलडाणा ते अजिंठा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून देऊळघाट व दत्तपूर दरम्यान टोलनाका उभारला जात आहे. ठेकेदाराने वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी पर्याप्त व्यवस्था केली नसल्याने, या ठिकाणी अनेक छोटे अपघात घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेणे गरजेचे झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.