आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अपघातात दोन महिला जागीच ठार; सहा प्रवासी गंभीर जखमी

मेहकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातून जड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला न जुमानता आजही शहरातून सर्रास जड वाहतूक करण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणून मंगळवारी सिमेंटने भरलेला कंटेनर काळी पिवळीला जावून धडकला. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या तर सहा प्रवासी जखमी झाले. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास शीतला माता मंदिराजवळ घडली. मंगळवारी एमएच ३०/पी/ ५५६९ या क्रमांकाची काळी-पिवळी प्रवाशांना घेवून साखरखेर्डाकडे जात होती.

तर टीएस ०१/यूसीओ/७५५ या क्रमांकाचा कंटेनर सिमेंटचे पोते घेवून शहराकडे येत होता. शीतला माता मंदिराजवळ कंटेनर व काळी-पिवळीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात साखरखेर्डा येथील पंचफुला आनंदा दुतोंडे (६४), यशोदा नारायण गवई (३४) रा. उसरण यांचा जागीच मृत्यू झाला. तर नारायण सूर्यभान गवई (५२) रा. उसरण, शारदा गजानन तुपकर (३६) रा. गुंज, प्रिती देवेंद्र ठाकुर (३०) रा. साखरखेर्डा, ललिता सचिनसिंग ठाकूर (३०) रा. साखरखेर्डा हे सहा प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.