आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. येथील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांच्या गाडीच्या काचावर दगड मारून तोडफोड केल्याची घटना ११ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली.उद्धव बाळासाहेब ठाकरेे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांच्या वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. १२ डिसेंबरच्या सकाळी ही घटना उघडकीस आली.
दरम्यान ११ डिसेंबरच्या रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी तोंडावर स्कार्फ बांधून आलेल्या एका अज्ञात महिलेने हे वाहन फोडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. शिवसेना दोन गटांत विभागल्यानंतर जिल्ह्यात दोन्ही गटात राडा झाल्याच्या काही घटना घडल्यात. खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडण्यात आल्याची घटना घडली होती. तर मोताळा तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा राजूर घाटात मारहाण झाली होती. दरम्यान आज कपिल खेडेकर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ वाहनाची तोडफोड केली.
सकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक गाऊन घातलेल्या व तोंडावर स्कार्फ बांधून आलेल्या महिलेने फरशीच्या तुकड्याने गाडी फोडल्याचे दिसून येत दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहन फोडणारी महिला कोण, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान या प्रकारामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून, जशास तसे उत्तर देण्याची भाषा बोलल्या जात आहे.
अशा भ्याड हल्ल्यांना भीक घालणार नाही
शिवसेनेच्या विभागणीनंतर आपण शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक वेळा दबाव आला. परंतु आपण फुटत नाही हे बघून काही विरोधक अशा घटना घडवून आणत असतील तर आपण या हल्ल्याला घाबरून जाणारे नाही. हल्ल्यातील खरा आरोपी पोलिसांनी शोधून अटक करावी, अशी मागणी कपिल खेडेकर यांनी केली आहे.
पोलिसांसमोर आव्हान घटना घडल्यानंतर पोलिसांनी देखील आता ठोस पाऊल उचलून या तोडफोडीमागे काेणाचा हात आहे, हे तपासण्यास सुरुवात केली. महिलेला समोर करून कुणी हे कृत्य केले. याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.