आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुटुंबासाठी जगणारी महिला स्वत:कडे पुर्णत: दुर्लक्ष करते. पती, सासू, सासरे, मुले यांची सेवा करतांना त्यांच्यासाठी तिने जगावे. असा नियमच महिलांनी स्वत:ला घालुन घेतला आहे. कुटुंबासाठी प्रेम असणे हा महिलांचा स्वाभाविक गुण आहे. मात्र हे सर्व टिकविण्यासाठी , कुटुंबाचे सुख बघण्यासाठी स्वत:लाही जगवणे आवश्यक आहे. त्या करता तिने आरोग्याची जोपासनी आजारी लक्षणे दिसताच तपासणीतून करुन घ्यावी, असे मार्गदर्शन स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.कृतिका हिरे हिने केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथील हिरे हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या शिबिराचे उद्घाटन बालरोग तज्ज्ञ डॉ. पंजाबराव हिरे व अलका हिरे यांनी केले.
बालरोग तज्ज्ञ डॉ.अक्षय हिरे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली. यावेळी डॉ. आशिष खासबागे, राजेंद्र काळे व अंजली परांजपे यांनी स्त्री शक्ती बाबत आपले मत व्यक्त केले. त्यानंतर जवळपास १०० महिलांची मोफत आरोग्य तपासणी डॉ.कृतिका हिरे यांनी केली. यावेळी महिलांच्या विविध आजारावर तपासणी केल्यानंतर मोफत औषधींचे वाटप करण्यात आले. अलका हिरे यांनी उपस्थित महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाला डॉ.जे.बी.राजपूत, छाया राजपूत, डॉ.एस.एस.राजपूत, राधा राजपूत, डॉ.अमित राजपूत, सपना राजपूत , डॉ.आशिष खासबागे, बुलडाणा नगर पालिका स्वच्छता व पर्यावरण ब्रॅण्ड अॅम्बेसिडर नीलेश भुतडा, विश्वास सोनुने, आरती मनीष राऊत, विश्वास सोनोने, ज्योती सोनोने, रविकिरण टाकळकर, लक्ष्मीकांत बगाडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन रणजितसिंग राजपूत यांनी केले. आभार अलका हिरे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.