आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयशरची दुचाकीला धडक, दोन ठार:खामगाव एमआयडीसीतील मोहता ऑइल मिलजवळील दुर्दैवी घटना

खामगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास एमआयडीसीमधील मोहता ऑइल मिल जवळ घडली.येथील बाळापूर फैलातील रामा भरतसिंग चव्हाण (२३) व त्याचा मित्र अनिल फकिरा डुकरे (३५) रा.सुटाळा बु. हे दोघे कामावरून त्यांची दुचाकी एमएच २८ एक्यू ४१५९ या क्रमांकाच्या मोटार सायकलने घरी येत असताना त्यांच्या दुचाकीला आयशर क्रमांक एमएच २८ बी ८५८८ च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे आपले वाहन चालवून दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे वरील दोघेही जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारांकरिता येथील सामान्य रुग्णालयात आणत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...