आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाचे नवीन शैक्षणिक सत्र २९ जून रोजी प्रारंभ होणार आहे. शहर व तालुक्यातील एकूण२९ हजार ९९३ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व १९ हजार ५२ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देऊन त्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळा सुरु होण्यासाठी केवळ सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष आता शाळा सुरु झाल्यानंतर नवीन मित्रांकडे लागले आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शासनाकडून देण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित शाळा मिळुन एकूण २०९ शाळा आहेत.यामध्ये मराठी माध्यमाच्या १७४, हिंदी माध्यमाच्या ३ व उर्दु माध्यमाच्या ३२ शाळेमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या एकूण १ लाख ७३ हजार ५७९ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. ही सर्व पुस्तके शाळेपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
या गणवेशाचा लाभ यंदा १४ लाख ४३ हजार २०० रुपये हे शिक्षण विभागातर्फे संबंधीत शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती, खामगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांनी दिली. शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदी करण्याची जबाबदारी देण्यात आली. या समितीचे सचिव मुख्याध्यापक आहेत. या समितीने खरेदी केलेले गणवेश हे शाळेच्या प्रवेशाच्या दिवशी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची स्वागत, रॅली, शाळा सजावट करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. अटाळी, भालेगाव, बोथाकाजी, गणेशपूर, गोंधनापूर, हिवरखेड, लाखनवाडा, निपाणा, पळशी बु., पिंपळगाव राजा, रोहणा, सुटाळा, टेंभुर्णा तर शहरातील नगर पालिका क्र. १ व २ अशा १५ केंद्रावरून शालेय स्तरावर पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
पहिल्या दिवशी गणवेश व पुस्तक आपापल्या शाळेतून घ्यावे
विद्यार्थी शाळेकडे वळावा यादृष्टीने शासनातर्फे शालेय पोषण आहाराबरोबरच मोफत गणवेश व पुस्तक वितरण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश व पुस्तक शाळेतून घ्यावे व अध्ययनाकडे लक्ष देऊन शाळेत यावे.
- गजानन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी खामगांव.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.