आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिक्षकांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व; प्राचार्य प्रफुल्ल ताठे यांचे प्रतिपादन

देऊळगावराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाविद्यालयीन काळात प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा प्रावीण्य मिळवावे. आई-वडिलांची आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे आपण जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परिषदे कडून कमी कालावधीत उत्कृष्ट मानांकन मिळवले असल्याचे प्रतिपादन प्राचार्य प्रफुल्ल ताठे यांनी केले.

येथील समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रफुल्ल ताठे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये विभाग प्रमुख प्रा. गोपालकृष्ण सीताफळे, प्रा.किशोर चराटे, प्रा. डॉ.दिनेश घुबे, प्रा.पवन नारखेडे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे स्वयंशासन पद्धतीने प्रशासन चालवले. शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी थेअरी व प्रात्यक्षिकांच्या तासिका घेऊन महाविद्यालयाचा कारभार सांभाळला. दरम्यान उत्कृष्ट तासिका व प्रात्यक्षिक घेणारे विद्यार्थी शिक्षकाला विशेष बक्षीस देऊन गौरवण्यात आले. प्रा.सीताफळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी शिस्त नीतिमूल्य व उत्साह हे गुण अंगी बाळगावी तसेच व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी प्रयत्न करावे. तर प्रा. चराटे यांनी शिक्षण प्रक्रिये विषयी माहिती दिली. शिक्षण ही शिकवणे व शिकणे अशी दुहेरी प्रक्रिया असून विद्यार्थ्यांनी शिकवलेले आकलन करून शिक्षकाला प्रतिसाद दिल्यास ही प्रक्रिया पूर्ण होते असे प्रतिपादन केले. दरम्यान, अशोक दाभाडे, वैशाली जायभाये, रूपाली तायडे, प्रमोद गिराम, शुभांगी कायंदे,रूपाली तायडे, वैभव नागरे, मोहम्मद रशीद, संदीप कठोरे,वैष्णवी मुंढे यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गावडे व अदिती धूळ यांनी तर आभार प्रतीक नेतनराव या विद्यार्थ्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...