आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पक्षाचा झेंडा:सरपंचपदी सुनीता खंडारे यांची बिनविरोध निवड

खामगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सर्वात मोठे गांव असलेल्या लाखनवाडा बुद्रुक ग्रामपंचायतीवर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकला असून सरपंचपदी काँग्रेसच्या सुनीता खंडारे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

सरपंचपदासाठी २४ जून रोजी लाखनवाडा ग्रामपंचायत कार्यालयात निवडणुक प्रक्रिया पार पडली. यावेळी सुनीता खंडारे यांच्या विरोधात कुठलाही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे त्यांची सरपंच म्हणून अविरोध निवड करण्यात आली. तहसीलदारांनी या निवडणूक प्रसंगी मंडळ अधिकारी अशोक हरिश्चंद्र भिल यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी अर्जाची छाननी करुन निकाल जाहीर केला. यावेळी माजी आमदार दिलीप सानंदा यांनी लाखनवाडा येथे जावुन अविरोध निवडून आलेल्या सरपंच सुनीता विजय खंडारे यांचा सत्कार केला. याप्रसंगी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ.सदानंद धनोकार, श्रीकृष्ण धोटे, चैतन्य पाटील, मनोज वानखडे, संताराम तायडे, सज्जादउल्ला खॉ, डॉ.गुफरान खान, अ‍ॅड.शहजाद उल्ला खॉं, शिवाजीराव पांढरे, कडूबा पांढरे, सुफीयान खान, वासुदेव कानकिरड यांची उपस्थिती होती. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लाखनवाडा ग्रामपंचायत वर काँग्रेसचा झेंडा फडकला होता.

ठरल्याप्रमाणे सरपंच शेख अफरोज यांनी आपला सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. तद्नंतर माजी आमदार दिलीप सानंदा यांनी लाखनवाडा येथील ग्रामपंचायत सदस्यांची व ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर एकमताने सरपंचपदासाठी सुनीता विजय खंडारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. नवनियुक्त सरपंच सुनीता खंडारे यांचा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.