आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जामोद मतदारसंघातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या ‘कुर्हा, वडोदा व इस्लामपूर उपसा सिंचन योजने’ला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार असून, धरण बांधकामाची उर्वरित कामे व पाइपलाइनची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आ. डॉ. संजय कुटे यांनी सांगितले. २०१९ च्या सत्ता नाट्यानंतर जळगाव जामोद मतदारसंघातील सिंचनाची अनेक कामे महाविकास आघाडी सरकारने बंद पाडली होती. त्यामध्ये या प्रकल्पाचा समावेश होता. परंतु जुलै महिन्यात झालेल्या सत्तातंरनंतर डॉ. कुटे यांनी सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देत, सर्व प्रकल्पांचा पाठपुरावा सुरू केला होता.
त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा या उपसा सिंचन प्रकल्पाला केंद्रिय पर्यावरण विभागाच्या मान्यतेची गरज असल्याचे समजताच, या विभागाचे केंद्रीय मंत्री जळगाव जामोद येथे १९ सप्टेंबर रोजी आले असता आमदार डॉ कुटे यांनी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या प्रकल्पाला त्वरित पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली.
तेव्हा पासून आज पर्यंत प्रकाल्पा बाबत असलेल्या अनेक अडचणी दूर करुन सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे पाठपुरावा सुरु केला होता. त्याचीच फलश्रुती म्हणून या प्रकल्पाला येणाऱ्या कॅबिनेट मध्ये २२२३.५३ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले असून, तसा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांतील २६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार
जिगांव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रा लगत असलेल्या गावात कुर्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील ५३ गावे, तर संग्रामपूर तालुक्यातील ३० गावे समाविष्ट आहेत. २६ हजार हेक्टर पेक्षा जास्त सिंचन होणार आहे. हे पाणी उपलब्ध झाल्याने याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होणार आहे याचा निश्चित आपणास आंनद आहेजळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांतील
२६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार
जिगांव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रा लगत असलेल्या गावात कुर्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील ५३ गावे, तर संग्रामपूर तालुक्यातील ३० गावे समाविष्ट आहेत. २६ हजार हेक्टर पेक्षा जास्त सिंचन होणार आहे. हे पाणी उपलब्ध झाल्याने याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होणार आहे याचा निश्चित आपणास आंनद आहे- आ. डॉ. संजय कुटे- आ. डॉ. संजय कुटे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.