आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा समितीचा पुढाकार:मलकापूर पांग्राच्या उर्दू शाळेने घेतला मोकळा श्वास

मलकापूर पांग्रा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. कचरा सडलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन शाळा समिती अध्यक्ष मो. जफर यांनी मुख्याध्यापकांसह सरपंच बंडु उगले यांच्या लक्षात ही बाब आणुन दिली. त्यावर सरपंच पतीने तत्काळ मैदानाची साफसफाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

ग्रामपंचायत प्रशासनाने जेसीबीच्या माध्यमातुन शाळेच्या मैदानाची साफसफाई केली. उशिरा का होईना मैदानाची साफसफाई झाल्यामुळे शाळेेने मोकळा श्वास घेतला आहे.अंढेरा मार्गावर उर्दू प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आहे. पहिली ते सातवी पर्यत असलेल्या या शाळेत दीडशे ते दोनशे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शाळेच्या बाजुलाच मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान आहे. परंतु नागरिकांनी या मैदानाचा वापर कचरा टाकण्यासाठी केला आहे. त्यामुळे हे मैदान डम्पिंग ग्राउंड बनले होते.

सडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सुटत असल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. अक्षरशा नाकाला रुमाल बांधुन विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असे. कचरा व दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब शाळा समिती अध्यक्ष मो. जफर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब मुख्याध्यापकांसह बंडू उगले यांच्या लक्षात आणून दिली.

त्यावरे मैदान साफ करण्यासाठी जो काही खर्च येईल तो, ग्रामपंचायत मार्फत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. काही दिवसांपूर्वीच जेसीबीच्या साह्याने शाळेच्या मैदानावरील पसरलेली घाण व कचरा साफ करून या आश्वासनाची पूर्ती केली. मैदानावरील घाण साफ झाल्यामुळे पालकांनी शाळा समिती अध्यक्ष मो. जफर मुख्याध्यापक व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...