आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्राहक संरक्षण कायद्याच्या निर्मितीत अ. भा. ग्राहक पंचायतचे मोलाचे योगदान असून सर्वसामान्य ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी या कायद्याचा प्रभावीपणे उपयोग करावा, असे आवाहन ग्राहक पंचायतचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुणे विद्युत ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष अॅड. अजय भोसरेकर यांनी केले. येथील दीनदयाल प्रबोधिनीत आयोजित ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतच्या अभ्यासवर्गात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे उपस्थित होते. प्रांत सचिव नितीन काकडे, संगठन मंत्री डॉ. अजय गाडे यावेळी मंचावर उपस्थित होते. सर्वसामान्य ग्राहकांना संरक्षण कायदा समजावून सांगण्यासाठी प्रथम कार्यकर्त्यांनी हा कायदा योग्य प्रकारे समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगून विविध महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अन्य समाज घटकांसाठी या कायद्याच्या प्रसाराकरता ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.
वीज कायद्यातील तरतुदींचा ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांनी अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे सांगूण महावितरणाच्या प्रचलित कार्यप्रणालीत अनेक त्रुटी असून, त्या दूर करण्यासाठी ग्राहकांनीच पुढाकार घ्यावा त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रभावी ग्राहक जागरण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्राहकांना या संदर्भात जागृत करण्याची विशेष जबाबदारी ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांची असल्याचे अॅड. भोसरकरांनी सांगितले. वीज समस्येत अंतिम जो ग्राहक असतो त्यावर साधक बाधक चर्चा आणि विचार होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांनी आपले हक्क समजून घेण्यासाठी वीज कायद्याचे अध्ययन करणे गरजेचे असून त्यासाठी महावितरणाच्या सहकार्याने वीज ग्राहक मेळावे आयोजित करण्याचे आवाहन विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी केले. प्रा. मतीन खान यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रांत सचिव नितीन काकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.