आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधनात्मक कार्यक्रम:वामनदादा, प्रतापसिंग यांनी भीमकार्याला जीवन वाहिले ; जीवनाचे महत्त्व  गीतगायनातून व्यक्त

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्वप्न भीमाचे नयनी दोघांच्या राहिले.. वामन आणि प्रतापसिंग हे तारे पाहिले.. भीम कार्याला ज्यांनी जीवन सारे वाहिले’ अशा शब्दांत शाहीर कृणाल बोदडे यांनी महाकवी वामनदादा कर्डक, शाहीर प्रतापसिंग बोदडे त्यांच्या संघर्षमय जीवनाचे महत्त्व गीतगायनातून व्यक्त केले.

तालुका कलावंतांचे वतीने महाकवी वामनदादा कर्डक जयंती व प्रतापसिंगदादा बोदडे यांना अभिवादन निमित्त येथील मराठा पाटील सभागृहात २८ ऑगस्ट रोजी बुध्द-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक भारिप बमसं प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहदेव दांडगे तसेच शाहीर डी.आर.इंगळे, प्रा.डॉ.किशोर वाघ, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, विशाखा सावंग, रमेश डोंगरे, मनोहर जाधव, गौतम गवई, दादाराव हेलोडे, आतिश खराटे, भाऊराव उमाळे, प्रकाश दांडगे, संदिप अंभोरे, विनेश इंगळे, देवेंद्र मेश्राम, संघपाल जाधव, भास्कर शेगोकार, किरण मोरे, गौतम नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाहीर गायक उत्तम फुलकर, देवा अंभोरे, विजय मांडकेकर, कवीश्वर अवचार, पंकज खंडारे, क्षितिज हिवराळे, सुमित गवई, गोपाळ हिवराळे यांनी साथ दिली. संचालन रमेश आराख यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता भारत हिवराळे, महेंद्र सावंग, विजय दांडगे, राहुल हिवराळे, मेजर जानराव इंगळे, देवानंद हिवराळे, रत्नमाला गवई, कल्पना खंडेराव, सागरआप्पा उकर्डे, दिनकर सरकार, बाळु गवई, मिलींद कळसकार, अनिरुद्ध सावदेकर यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...