आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वंजारी समाज मेळावा; गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ वंजारी समाज सेवा परिषद द्वारा वंजारी समाज मेळावा व गुणवंतांचा सत्कार बुलडाणा येथे ८ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता गर्दे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समाज मेळाव्यास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ.भागवत कराड, माजी सामाजिक न्याय मंत्री आ.धनंजय मुंडे, खा.प्रितमताई मुंडे, आ.सुहास कांदे, आ.संतोष बांगर, आ.नरेंद्र दराडे, आ.किशोर दराडे, माजी आ.तोताराम कायंदे, माजी आ.संजय दौंड, महंत राधाताई सानप, अ‍ॅड.अविनाश आव्हाड, फुलचंद कराड, गोपीनाथराव वाघ यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती डॉ.राजेंद्र वाघ यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भ वंजारी समाज सेवा परिषद सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असतो, गोपीनाथराव मुंडे असताना दरवर्षी वंजारी समाज मेळावा आयोजित करुन त्यात गुणवंतांचा सत्कार केल्या जात असे परंतू मध्यंतरी या कार्यक्रमांना खंड पडला. तरी आता बुलडाणा येथे येत्या मंगळवारला ८ नोव्हेंबरला रोजी हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास कोषाध्यक्ष भाऊराव करपे नागपूर, सहकार्यवाहक प्रभाकरराव कापकर गडचिरोली, पंजाबराव इलग बुलडाणा, उपाध्यक्ष मधुकरराव जायभाये बुलडाणा, रेणूराव हेमके घाटंजी, योगेश कापकर आडमोरी, प्रा.अशोक डोईफोडे चंद्रपूर, डॉ.हेमलता लहामगे यवतमाळ, दिगंबरराव भुसे अध्यक्ष बुलडाणा जिल्हा, जगन्नाथ बडे संघटक वर्धा, दिगांबर चांगले नागपूर, डॉ.रमाकांत घुगे वाशीम, चंद्रशेखर भडांगे गडचिरोली, वासुदेवराव घुगे वर्धा, संतोषराव लहामगे चंद्रपूर, डॉ.प्रतापराव तारक यवतमाळ यांची उपस्थिती राहणार आहे.

तरी समाज बांधवांनी विदर्भातून १० वी, १२ वी मध्ये सन २०२१-२२ या वर्षात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे, एमपीएससी, युपीएससीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली नावे डॉ.राजेंद्र वाघ व दिगांबरराव हुसे यांच्याशी संपर्क साधून त्यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेस विदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वाघ, प्रल्हादराव काळूसे, प्रल्हादराव केदार, मधुकरराव जायभाये, कारभारी वारे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...