आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जळका भडंग येथे श्रमदानातून वनराई बंधारा; कृषी विभागाच्या पुढाकाराने उमरा येथेही गावकऱ्यांनी राबवला उपक्रम

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका कृषी विभाग व गावकऱ्यांच्या मदतीने तालुक्यात श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यातील जळका भडंग येथे कृषी विभाग व गावातील ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदानातून तालुका कृषी अधिकारी स्वप्नील जगधने यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा बांधण्यात आला.

या वनराई बंधाऱ्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. शिवाय ओढे-नाले जिवंत राहण्यास मदत होईल. परिणामी सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. त्या सोबतच उमरा येथे वनराई बंधारा तयार करण्यात आला आहे.

यावेळी सरपंच मीराबाई राजेंद्र अंभोरे, पोलिस पाटील किशोर अंभोरे, नामदेव दाभाडे, राजेंद्र अंभोरे, तालुका कृषी अधिकारी स्वप्नी जगधने, मंडळ कृषी अधिकारी भाग्यश्री देसले, कृषी पर्यवेक्षक शिवाजी थवील, कृषी सहाय्यक एन. डी. कोळी, अमोल धामणकर, प्रवीण रत्नपारखी, विजय जैवळ, वाय. बी. पाटील, एच. टी. पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते एकनाथराव भोजने, माधव माने, शिवा कवळे, संजय अंभोरे, राजू दाभाडे रवींद्र दाभाडे, कराडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. तसेच जळका भडंग येथे कृषी विभाग व गावातील नागरिकाच्या वतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी कृषी सहाय्यक पी बी. गंध्रे, बी.जे हंडाळ, एस. एल. राऊत, एस. व्ही. दांडगे तसेच किरण गायगोळ, गोपाल बोदडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...