आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम:उद्या श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

मेहकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील डोणगाव रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रीं च्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन उद्या १ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.येथील संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने दरवर्षी श्रींची पुण्यतिथी अर्थात ऋषिपंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सकाळी सात वाजता श्रींचा लघु रुद्राभिषेक, विविध धार्मिक कार्यक्रम सकाळी अकरा वाजता, हभप देवदत्त महाराज पितळे यांचे प्रवचन बारा वाजता, महाआरती झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.

यावेळी जप, पारायण, मंदिर परिसरात वृक्षारोपण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा समितीचे अध्यक्ष श्याम उमाळकर, उपाध्यक्ष सुदेश लोढे, सुरेश मुंदडा, घनश्याम जोशी, भूषण मीनासे, दत्तगुरु जोशी, बाळासाहेब सावजी व समस्त विश्वस्त मंडळाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...