आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय बिलाची चौकशी:जिल्हा कचेरीसमोर वरवंड आश्रम शाळेच्या शिक्षकाचे उपोषण सुरू

बुलडाणा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाज कल्याण सहसंचालकाच्या अहवालानुसार सहायक आयुक्तांवर कारवाई करून सहायक आयुक्त अनिता राठोड यांच्या कार्यकाळात काढलेल्या थकीत वेतनाची चौकशी करावी, अदा केलेल्या वैद्यकीय बिलाची चौकशी कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी तालुक्यातील वरवंड येथील आश्रम शाळेचे सहायक शिक्षक संजय वैराळकर यांनी ५ सप्टेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.

२७ नोव्हेंबर २०१९ नुसार समाज कल्याण सहायक आयुक्तांना कुठलेच वैद्यकीय बिले अदा करण्याचे अधिकारी नसताना त्यांनी एजंटमार्फत आर्थिक व्यवहार करून काही कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय बिलाचा लाभ दिला आहे. जिल्ह्यातील आश्रम शाळेत निवासी विद्यार्थी नसताना संबंधित अधिकारी शाळेला भेटी देतात. या भेटी दरम्यान एकही निवासी विद्यार्थी शाळेत उपस्थित नसताना अधिकारी आपल्या अहवालात ९० ते ९५ टक्के विद्यार्थी उपस्थित असल्याची नोंद करतात. त्या नोंदीच्या आधारे अनुदानाची फाइल वरिष्ठ कार्यालयास सादर करून शासनाची आर्थिक फसवणूक करतात. एवढेच नव्हे तर अनेक शाळेत बोगस निवासी विद्यार्थी दाखवून व वसतिगृह अधीक्षक खर्चाचे विवरण सादर करून संस्थेची व शासनाची फसवणूक करतात. याबाबत सहायक संचालक प्रकाश दासे यांनी तपासणी करून आर्थिक अनियमितता झाल्याचे अहवालात नमुद केले होते.

परंतु अद्यापही संबंधित अधिकाऱ्यावर कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे या अहवालाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, बोगस निवासी विद्यार्थ्याची तपासणी करावी, यासह इतर मागण्यासाठी तालुक्यातील वरवंड येथील आश्रम शाळेचे सहायक शिक्षक संजय वैराळकर यांनी ५ सप्टेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...