आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठोस धोरणात्मकतेचा अभाव:हिवरा शेतकरी प्रशिक्षण केंद्राची वास्तू कुलूप बंद

मानोरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुक्यातील बळीराजाची नकारात्मक मानसिकता बदलून सकारात्मकतेची पेरणी करण्यासाठी लाखो रुपयाचे खर्च करून वाई गौळ- धानोरा रस्त्यावर तब्बल दोन वर्षांपूर्वी बांधून तयार असलेली वास्तू कुलूप बंद असून ह्या वास्तूचा नेमका उद्देश काय हे येथून ये-जा करणाऱ्या वाटसरूंना व तालुक्यातील शेतकऱ्यांना पडल्याशिवाय राहत नाही.

तालुक्यातील शेंदुर्जना पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील भिल डोंगर फाट्यावर निसर्गरम्य ठिकाणी हिवरा खुर्द वन बीटातील वन जमिनीत मोक्याच्या ऐस-पैस जागेवर तालुका व जिल्ह्यातील अभावग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी या भव्य वास्तूची निर्मिती करण्यात आल्याची चर्चा अनेक नागरिक करीत असतात. राज्यात सरासरी दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत असून त्याला मानोरा तालुका सुद्धा अपवाद नाही. आजच्या तारखेला दोन महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आत्महत्या ग्रस्त राज्याचा कलंक पुसण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नये यासंदर्भात ठोस धोरणात्मकतेचा अभाव राज्यात दिसून येत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झालेले आहे.

बळी राजांनी जीवन संपवू नये यासाठी दिवंगत संत डॉ. रामराव महाराज बापू यांच्या हस्ते धो-धो पाऊस पडत असताना शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या या इमारतीचे तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी, अधिकारी कर्मचारी, पुढार्‍यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना उभारी देण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करून उभारण्यात आलेल्या या वस्तूचा हेतू मूळ उद्देशापासून का भरकटला आहे या संदर्भात तालुक्यातील पुढारी, कृषी विभाग, वन विभाग आणि इतर जबाबदार विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र वर्षानुवर्षे कानावर हात व तोंडावर बोट का ठेवलेले आहे हे या वास्तू कडे पाहून कळत नसल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...