आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी निकाल:विज्ञान विभागातून वेदश्री दलाल; तर कलामधून अतुल राठोड प्रथम ; भारत कनिष्ठ महाविद्यालयाचे 47 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत कनिष्ठ महाविद्यालय बुलडाण्याचा बारावीचा निकालात विज्ञान व कला शाखा मिळून एकूण २४४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २४१ विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून प्रावीण्य श्रेणीमध्ये ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच कला शाखेतून प्रावीण्य श्रेणीमधून १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून वेदश्री विनोद दलाल हिने प्रथम क्रमांकाने ९०.३३ टक्के गुण संपादित केले आहेत . तसेच साक्षी सुशील जोशी हिने ८७ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर श्रुतिका जितेंद्र पाटील ८६.३३ टक्के गुण मिळवत तिसरी आली आहे. मयंक अतुल कालावाडिया ८६.१७, तन्मय दिलीप नारखेडे ८५.३३, ऋषिप्रसाद सुखदास मंझरटे ८५.१७, हर्षदा मदनसिंग राठोड ८५ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कला शाखेने ही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कला शाखेतून अतुल रोहिदास राठोड याने प्रथम क्रमांक प्राप्त करत ८७.३३ टक्के गुण मिळवले आहेत. तर दिव्या दिलीप सोनुने हिने ८५.५० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. दुर्गा गणेश काळे ८२.५०, उर्वशी उमेश कपूरे ८१.६७, शिवम ज्ञानेश्वर हुडेकर ८०.६७ टक्के गुण मिळवून गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाबद्दल भारत विद्यालय परिवाराच्या अध्यक्षा डॉ. सीमाताई हर्षवर्धन आगाशे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांनी निकालाचे श्रेय सर्व शिक्षकांना देत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेचे उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे व पर्यवेक्षक नवल गवई यांनीही सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...