आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वाहनाची दुचाकीला धडक, एक ठार, दोन जखमी

दुसरबीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नादुरूस्त असलेल्या राहेरी पुलामुळे काही वर्षांपासून बंद असलेली वाहतुक नवीन पुलावरून सुरू करण्यात आली आहे. परंतू अतिशय अरुंद व कडा न भरलेल्या या मार्गावर नित्याची अपघातांची मालिका सुरूच आहे. सिंदखेडराजाहुन दुसरबीडकडे येणार्या दुचाकीला समोरुन भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात साठ वर्षीय वृध्द जागीच ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गणपती मंदिरासमोर घडली.

नागपूरवरुन मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना जवळचा मार्ग म्हणून दुसरबीड रस्ता आहे. त्यामुळे बहुतांश वाहन चालक या मार्गाचा वापर करतात. वाहतूक वाढल्याने अपघातांची मालिकाही सुरूच आहे. या मार्गाच्या कडा भरलेल्या नाहीत. तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला गवत उगवले असून पुलावर मातीचे ढिगारे साचले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहन चालकांची चांगलीच कसरत होत आहे. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास येथील गणपती मंदिरासमोर सिंदखेडराजाहुन दुसरबीडकडे येणाऱ्या एम.एच.२०/ ए के /७०४९ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील साठ वर्षीय तुकाराम विष्णू उगले रा.उगला, हे वृद्ध जागीच ठार झाले. तर अशोक अडाणे रा.जऊळका वय ४० व सोमनाथ आंबेकर रा.औरंगाबाद वय ३८ हे दोन जण गंभीर जखमी झाले. जखमीवर दुसरबीड येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु सोमनाथ आंबेकरची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले आहे. श्रीराम विष्णू उगले यांच्या तक्रारीवरून क अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला .

बातम्या आणखी आहेत...