आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू:वाळूची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले

लोणार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर तहसीलदार सैफन नदाफ यांनी कारवाई करून वाहन मालकास ३ लाख ६६ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. ही धडक कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून महसूल पथक हे अवैध गौण खनिज रोखण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. परंतु, या पथकासह तहसीलदार नदाफ यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या व्यक्ती पथक कोठे आहे, याची माहिती अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांना भ्रमणध्वनीवर देत होती. त्यामुळे वाळू तस्कर आपली वाहने ही मराठवाडा हद्दीतच थांबवून ठेवत होते. त्यामुळे पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागत होते. ही बाब लक्षात येताच नदाफ यांनी मेहकर येथे तातडीच्या बैठकीला जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर ते सुलतानपूरपर्यंत बारा किलोमीटर मेहकरच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे पाळत ठेवणाऱ्या खबऱ्यांनी ही माहिती वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना दिली. त्यामुळे वाळूची वाहतूक करणारी वाहने लोणारच्या दिशेने यायला सुरुवात झाली. त्यानंतर नदाफ यांनी सुलतानपूरवरून परत लोणारच्या दिशेने येत उर्वरित पान शहरातील आस्वाद हॉटेलसमोर सापळा रचून अचानक वाळू वाहनाची तपासणी सुरू केली. त्यामध्ये एमएच. २१, बीएच ४००८ या क्रमाकांचा चालक रमेश गायकवाड (रा. टाकळखोपा ता.मंठा), एमएच. २१, बीएच ०९२६ या क्रमांकाचा वाहन चालक साईनाथ बोंडे (रा. वाघाळा ता. मंठा), एमएच. २१, बीएच ४७९३ या क्रमांकाचा वाहन चालक राम किसन घुले (रा. इंचा) हे विना परवाना अवैध वाळूची वाहतूक करताना आढळून आले. ही वाहने तत्काळ तहसील कार्यालयाला जमा करण्यात आली. उपरोक्त वाहनांना ३ लाख ६६ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

बातम्या आणखी आहेत...