आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैदीप्यमान कामगिरी:व्यंकटेश महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स सुवर्ण पदकाचे मानकरी

देऊळगावराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी १३ महाराष्ट्र बटालियनी २४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान खामगाव येथे आयोजित सात दिवसीय ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभाग नोंदवला. दरम्यान पार पडलेल्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.

  ओम सोळुंके, नेहा पिंपळे या कॅडेट्सनी ड्रिल मध्ये तर कांचन कोल्हे या कॅडेटने फायरिंगमध्ये सुवर्णपदक मिळवले. त्यांच्या या दैदीप्यमान कामगिरीबद्दल १३ महाराष्ट्र बटालियन तर्फे या कॅडेट्सना सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना एन.सी.सी एएनओ प्रा. डॉ. महेश तांदळे व एन.सी.सी. केअर टेकर प्रा. डॉ. गजानन तांबडे यांचे मार्गदर्शन लाभले. एनसीसी कॅडेट्सच्या या यशाबद्दल श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे तसेच प्राध्यापक व त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतूक केले.

बातम्या आणखी आहेत...