आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा जल्लोष:राज्यसभेतील विजय; भाजपचा जल्लोष ; कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी

बुलडाणा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपच्या तीन सदस्यांचा झालेल्या दणदणीत विजयाचा भाजप जनसेवा कार्यालय बुलडाणा येथे शनिवारी करण्यात आला. जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनात आणि शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, भाजप तालुकाध्यक्ष ऍड. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शहरातील कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्षा विजया राठी, तालुका सरचिटणीस डॉ. राजेश्वर उबरहंडे, तालुका सरचिटणीस एडवोकेट दशरथसिंह राजपूत,भाजपा विधी आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड.मोहन पवार, नगरसेविका सुभद्रा इंगळे,नगरसेवक गोविंद सराफ, नगरसेवक अरविंद होंडे, भाजप शहर उपाध्यक्ष किरण राठोड, पंडितराव सपकाळ, नितीन बेंडवाल, प्रीतेश बेदमुथा, नारायण तोंडीलायता, वैभव इंगळे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मंदार बाहेकर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सोहम झाल्टे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश राजपूत, युवा मोर्चा शहर सरचिटणीस मोहित भंडारी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सतीश पाटील, युवा मोर्चा तालुका संपर्क प्रमुख सोपान जगताप, प्रदीप सोनटक्के, विवेक खोत, विनोद डाबेराव, गिरीश किणीकर, अशोकराव कीलबिले, सागर पाटील, सतीश पाटील, भाजप तालुका सचिव राजेश पाठक, गजानन बापू देशमुख, अक्षय छाजेड, कुलदीप पवार, विठ्ठल नरोटे, श्रीरंग कोसे, सूरज गवई, प्रवीण गाडेकर, संजय लोखंडे, श्रीकृष्ण मख यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...