आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान:विविध मागण्यांचे विदर्भवाद्यांचे‎ तहसीलदारांना दिले निवेदन‎

मेहकर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वंतत्र विदर्भ राज्याची निर्मिती‎ करून वाढीव वीज बिल माफ करा,‎ अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान‎ झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ६०‎ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची‎ मागणी विदर्भ राज्य आंदोलन‎ समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे‎ तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी व अमित शाह यांच्याकडे‎ करण्यात आली.‎ निवेदनानुसार, विदर्भाच्या‎ सर्वांगीण विकासासाठी,‎ नक्षलवादाला आळा घालण्यासाठी‎ व रोजगारासाठी स्वंतत्र विदर्भ‎ राज्याची निर्मिती करण्यात यावी,‎ अशी मागणी कित्येक वर्षांपासून‎ केंद्र सरकारकडे करण्यात आली.

‎परंतु अद्यापही या मागणीची दखल‎ घेण्यात आली नाही. त्यामुळे‎ स्वंतत्र विदर्भ राज्याची निर्मिती‎ करून अवाजवी वीज बिल माफ‎ करावे, अतिवृष्टीमुळे पिकाचे‎ नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना‎ हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत‎ देण्यात यावी, अशी मागणी‎ करण्यात आली.

निवेदन देताना‎ विदर्भ राज्य आंदोलन समितीचे‎ अध्यक्ष ॲड. सुरेश वानखेडे,‎ तालुकाध्यक्ष संजय सुळकर,‎ प्रल्हाद बाजड, सोपान देबाजे,‎ अशोक इंगळे, गजानन पवार,‎ पंढरी म्हस्के, बी. बी. चौधरी,‎ राधेश्याम भराडे, प्रल्हाद रहाटे,‎ तेजराव सुरूशे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...