आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:पद्मावती नदीपात्राच्या साफसफाईसाठी ग्रामस्थांचे उपोषण; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

जळगाव जामोद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मावती नदी पात्राची साफसफाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी नदीच्या पुलावर आज १५ जूनपासून उपोषणास सुरूवात केली आहे.

पालिका प्रशासनाने शहराच्या मध्यातून वाहत असलेल्या पद्मावती नदीपात्राची मान्सून पुर्व साफसफाई केली नाही. त्यामुळे नदीपात्रात मोठ-मोठी झाडे उगवली असून पात्रात गटारीचे पाणी साचले आहे. या घाण पाण्याची दुर्गंधी सुटत असल्यामुळे नदी काठी राहत असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु याकडे मुख्याधिकारी व प्रशासक दुर्लक्ष करत आहे. नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी व पात्र जिवंत ठेवण्यासाठी नदीपात्राची साफसफाई करण्यात यावी, जेणे करुन जमिनीत पाणी झिरपण्यासाठी व पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. या मागणीसाठी अतुल दंडे, अनिल इंगळे, प्रवीण तायडे, अमोल म्हसाळ यांनी नदीच्या पुलावर उपोषणास सुरूवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...