आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो रुपये ताब्यात:चांडोळ येथील गावकऱ्यांनी पोलिसांना पिटाळले ; जुगार अड्ड्यावर धाड

बुलडाणा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील चांडोळ येथे धाड पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह आठ कर्मचारी यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याकरीता १ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास चांडोळ येथे गेले. दरम्यान, लाखो रुपयांचा मुद्देमाल व आरोपी यांना ताब्यात घेतले. परंतु सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच या ठिकाणी गावकऱ्यांनी गर्दी जमा केली होती. गावकऱ्यांच्या गर्दीपुढे पोलिस हतबल झाले आणि आरोपींना ताब्यात न घेताच मिळेल त्या वाहनाने धाड पोलिस स्टेशन गाठले असल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ८ कर्मचारी व १ अधिकारी चांडोळ येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी जात असल्याची नोंद घेऊन चांडोळ येथे गेले व धाड टाकली. मात्र धाड टाकते वेळी गावातील नागरिक जमा होतमोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. पोलिस व गावकऱ्यांमध्ये झटापट होऊन मुद्देमाल घेत धाड पोलिस स्टेशनचे घेऊन असल्याची माहिती एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तसेच यावेळी एका कर्मचाऱ्याला या जमावाने धक्काबुक्की केल्याची चर्चा सुद्धा आहे. या पथकातील तो अधिकारी एकाच्या मोटर सायकलवर बसून आल्याचे चर्चा सुद्धा होत आहे.

गावकऱ्यांमध्ये घटनेविषयी उलट-सुलट चर्चा
चांडोळ येथे गस्तीवर असताना गुप्त माहितीच्या आधारे त्याठिकाणी धाड टाकली. परंतु जुगाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र याबाबत गावकऱ्यांमध्ये उलट सुलट सुरु आहेत.
- अनिल पाटील, ठाणेदार पोलिस स्टेशन धाड.

बातम्या आणखी आहेत...