आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या निकाली काढणार:उदयनगर ग्रामस्थांचे ग्रा.पं. समोर धरणे ; सरपंच प्रदीप अंभोरे यांनी दिले आश्वासन

उदयनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गावातील प्रस्तावित व मंजूर कामे सुरू करून ग्रामस्थांच्या समस्या निकाली काढाव्यात, यासह इतर मागण्यांसाठी ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी दीपक गिऱ्हे व सरपंच प्रदीप अंभोरे यांनी आश्वासन देऊन आंदोलनाची सांगता केली.

संजय गांधी निराधार समितीच्या लाभार्थ्यांना लाभ द्यावा, पंतप्रधान आवास योजनेचे अल्पसंख्याक समाजासाठी ग्रा. पं.ला उद्दिष्ट मिळाले नाही. तरी अल्पसंख्याक समाजाला उद्दिष्ट मिळावे. इतर मागासवर्गीय घटकातील लाभार्थ्यांना लाभ देऊन घरकुल बांधकाम सुरू करावे. दलित वस्ती अंतर्गत अंदाजे ५५ लाख रुपये निधीच्या काम सुरू करावे. अपंगांना पाच टक्के निधी वाटप करावा. या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे रफिक शेख, जितेंद्र पुरोहित, प्रशांत झिने यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यात शेख शरीफ शेख हबीब, अनिल अंभोरे, नासिर भाई, शिवराज पाटील, शेख रफिक शेख शब्बीर, राजिक खान, शेख शाहिद, गणेश भगत आदींनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...