आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंग:महिला उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गुंजाळा येथे सरपंचपदाच्या उमेदवार अरुणा सुनील केदार यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी निवडणूक विभागाच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंजाळा येथील सरपंचपदाच्या उमेदवार असलेल्या अरुणा सुनील केदार या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता दि. १५ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान दोन वाहनांवर माईक आणि लाउडस्पीकर लावून मतदारांना आमिष देत होत्या, अशी तक्रार चिखली येथील विस्तार अधिकारी विलास राजाराम अंभोरे यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात दिली. या घटनेमुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सोशल मीडियावरही हा प्रकार व्हायरल झाल्याने या प्रकरणाची दखल घेऊन रात्रीच निवडणूक विभागाचे अधिकारी आणि पोलिस गुंजाळा येथे दाखल झाले. दरम्यान, दि. १६ डिसेंबर रोजी अरुणा सुनील केदार यांच्यासह दोन्ही वाहनांच्या चालकांविरूद्ध अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...