आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक विभाग:मतदान-आधार कार्ड लिंक मोहीम वांद्यात! ; कामास नकार देणाऱ्या बीएलओविरुद्ध कारवाई

बुलडाणा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या आधार-मतदान कार्ड जोडणी (लिंक) मोहीम बुलडाणा तालुक्यात वांद्यात आल्याचे चित्र आहे. या मोहिमेत काम करण्यास नकार देणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सविरुद्ध चक्क फौजदारी कारवाई करण्याची तयारी बुलडाणा तहसील कार्यालयाने चालवली आहे.

ही मोहीम निवडणूक विभागाच्या मार्गदर्शनात १३ तहसील कार्यालयांनी हाती घेतली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत बुलडाणा तालुका यात माघारल्याचे दिसून येते. बुलडाणा तालुक्यातील बूथ लेव्हल ऑफिसरमार्फत हे काम करण्यात येत आहे. या मोहिमेची मुख्य जबाबदारी त्यांची आहे.

या बीएलओमध्ये समाविष्ट असलेल्या काही अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी हे काम करण्यास नकार दिला. यामुळे तालुक्यातील ही मोहीम अडचणीत आली असून, तहसीलदारांनी अशा अंगणवाडी व आशा सेविकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सुद्धा याची कल्पना दिली. ही मोहीम निवडणूक विषयक राष्ट्रीय कर्तव्य असल्याने त्याला नकार देणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तयारी बुलडाणा तहसील कार्यालयाने सुरू केली आहे.यासंदर्भात विचारणा केली असता तहसीलदार रूपेश खंडारे यांनी याला दुजोरा दिला. ज्या सेविका मंगळवारपर्यंत संमतीपत्र देणार नाही त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे खंडारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...