आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:मोताळा 11 ग्रा.पं.साठी मतदान शांततेत

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी आज १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली आहे. यावेळी तालुक्यातील २१ हजार २११ मतदारांपैकी १५ हजार ९१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून त्याची ७५ टक्केवारी आहे. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषीत करण्यात येणार आहे. परंतु तोपर्यँत मतदारासह उमेदवारांना निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

त्यामुळे या मुदत संपलेल्या ११ ग्रामपंचायतच्या १०३ सदस्यांच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. परंतु त्यापैकी १८ सदस्य हे अविरोध निवडून आले असून दोन ठिकाणी आरक्षित असलेल्या जागांवर आरक्षणानुसार उमेदवारी अर्ज न आल्यामुळे या दोन जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे ८३ ग्रामपंचायत सदस्यांसाठी आणी सरपंचाची निवड ही थेट जनतेतून होत असल्याने ११ सरपंच पदासाठी सार्वत्रीक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...