आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 904 मतदान केंद्र:251 सरपंच, तर 1 हजार 547 सदस्यपदांसाठी आज मतदान

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदांसाठी आज (दि. १८) रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तत्पूर्वी २१ सरपंच व ७३५ सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याने, रविवारी २५१ सरपंच आणि १ हजार ५४७ ग्रा. पं. सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार ८९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, १३ तालुक्यांत एकूण ९०४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यातील ७ ग्रामपंचायतींना सरंपचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने त्या या जागा रिक्त राहणार आहे.

बुलडाणा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपद व ११४ जागांसाठी मतदान होणार होते. परंतु तीन जागी नामनिर्देशन पत्र प्राप्त नाही. तर २७ जागा बिनविरोध व दोन सरपंच पद बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे दहा सरपंच व ८४ सदस्य पदासाठी उदया मतदार होणार आहे. चिखली तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या सरपंच व २२२ सदस्यपदासाठी निवडणूक होणार होती. त्यापैकी एका जागेसाठी अर्ज प्राप्त नाही.

९६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. १२५ सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे. सरपंच वगळून पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २३ ग्राम पंचायतींची निवडणूक होणार आहे. पाच सरपंचपदही बिनविरोध निवडून आले आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील १९ ग्राम पंचायतींच्या सरपंचपद व १५३ जागेसाठी निवडणुका होत्या. तीन जागी अर्ज प्राप्त नाही तर ४६ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. दोन ग्राम पंचायती बिनविरोध आल्या आहेत.

जिल्हयाची स्थिती अशी
एकूण जागा ग्रामपंचायती व सरपंच पद २७९, एकूण सदस्य संख्या २३२५, वैध नामनिर्देशन प्राप्त नसलेली संख्या ४३, बिनविरोध सदस्य संख्या ७३५, निवडून द्यावयाचे सदस्य १५४७, बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या २५, एकही अर्ज प्राप्त नसलेल्या जागांची संख्या २५, प्रत्यक्ष मतदान होणार ग्राम पंचायतींची संख्या २५४, सरपंच पदासाठी एकही नामनिर्देशन नसलेली संख्या ७, बिनविरोध सरपंच २१, तर २५१ सरपंच पदासाठी निवडणूक.

बातम्या आणखी आहेत...