आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील सहा महिन्यांपासून मुदत संपलेल्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात नागरिकांपासून तर इच्छुकांपर्यंत सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असताना आज १३ जून रोजी येथील पालिकेच्या संकुलाच्या पटांगणावर ईश्वर चिठ्ठी काढून प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये शहरातील पंधरा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरात एक प्रभाग वाढवण्यात आला असून त्यामुळे दोन सदस्य वाढणार आहेत. अशा प्रकारे शहरात एकूण पंधरा प्रभाग होत असून तीस सदस्य राहणार आहेत. तसेच पालिका प्रशासनाने प्रभाग रचना करून प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. हे सर्व होत असतानाच प्रभागातील जागांच्या आरक्षणाला घेऊन मात्र शहरवासीयांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान, आज झालेल्या आरक्षणाच्या सोडतीमुळे मात्र त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यासाठी नियमानुसार महिलांसाठी ५० टक्के जागा म्हणजेच पंधरा जागा राखीव सोडण्यात आल्या. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या सोडतीचा कार्यक्रम पालिकेच्या संकुलात आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपजिल्हा अधिकारी भिकाजी घुगे, तहसीलदार राजेश सुरडकर व मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये शहरातील पंधरा प्रभागातील तीस जागांसाठी अ ब अशा दोन गटांसाठी सोडत काढण्यात आली. त्यापैकी अ गटातील १४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या तर प्रभाग क्रमांक दोन मधील अ, गट सर्वसाधारण तर ब गटातील जागा महिला अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली, तसेच प्रभाग क्रमांक १४ मधील अ, गट हा अनुसूचित जातीसाठी तर ब गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
मलकापुर विधानसभा मतदार संघातील नांदुरा ही आमदार राजेश एकडे यांच्याच ताब्यात होती. तर मलकापूर वर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. यावेळी भाजपला नवीन प्रभाग रचना कितपत साथ देते. हा प्रश्नच आहे कारण मागील निवडणुकीत भाजपचे काही वर्चस्व नव्हते. त्यामुळे चैनसुख संचेती काँग्रेसच्या ताब्यातून कशी भाजपच्या ताब्यात पालिका आणते. तशी प्रभाग रचनेचा वापर कोणता उमेदवार टाकून
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.